मुंबईतील हरितपट्टय़ाचे संरक्षण करण्यात पालिका अपयशी ठरल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने बुधवारी पालिकेला धारेवर धरले. तसेच न्यूयॉर्कप्रमाणे मुंबईत ‘सेंट्रल पार्क’ का उभारले जात नाही, असा सवालही न्यायालयाने पालिकेला केला.
‘मिलिबग’ या कीटकामुळे मुंबईतील झाडे मरत असल्याप्रकरणी झोरू बथाना यांनी जनहित याचिका केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने मुंबईतील हरितपट्टय़ाचे संरक्षण करण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न केले जात नसल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. झाडे वाचवण्यासाठी कुठल्याही धोरणाशिवाय ज्या उपाययोजना केल्या जात आहेत.