क्षुल्लक चुकीवरून ५ वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. मिशेल अँंथोनी असे या शिक्षिकेचे नाव असून तिला १८ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
प्रख्यात कोलंबा हायस्कूलमध्ये मोठ्या शिशू वर्गात शिकणाऱ्या प्रिंसिका बुगडे या विद्यार्थीनीने ३१ ऐवजी १३ लिहिले होते. त्या छोट्या चुकीवरून वर्गशिक्षिका मिशेल अँंथोनी (३५) हिने तिला फुटपट्टीने पायावर बेदम मारहाण केली होती. वैद्यकीय चाचणीत मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु उलट ती पडली आणि लागले असा उलट कांगावा मिशेलने केला होता. तिच्या पालकांनी गावदेवी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी मिशेलला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिला १८ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2014 रोजी प्रकाशित
मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक
क्षुल्लक चुकीवरून ५ वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 11-01-2014 at 03:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai columba school teacher to be arrested today for caning 5 year old girl