बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी ३१ मेपर्यंत वाढ केली. आयपीएलमधील सट्टेबाजीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून विंदू दारा सिंगला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विंदूच्या जबानीवरून पोलिसांनी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांनाही सट्टेबाजीच्या आरोपावरून अटक केली.
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने विंदू दारा सिंगला मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. विंदूकडून अजून सट्टेबाजीबद्दल आणि या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱयांबद्दल माहिती मिळवायची आहे, त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करीत त्यांच्या पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ केली. न्यायालयाने सट्टेबाजांच्या पैशाचे व्यवहार करणाऱया अल्पेशकुमार पटेल आणि प्रेम तनेजा यांच्याही पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ केलीये.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2013 रोजी प्रकाशित
विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत वाढ
बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी ३१ मेपर्यंत वाढ केली.
First published on: 28-05-2013 at 04:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai court extends police custody of actor vindoo randhawa till may 31 in the ipl betting case