मात्र १५ टक्के कपात कायम
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध असल्याने ऑगस्ट २०१६ पर्यंत तरी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी सध्या सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात कायम राहणार असल्याने काही प्रमाणात पाणी टंचाईची झळ मुंबईकरांना सोसावी लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या आठ लाख ९२ हजार ३१६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे गुरुवारी घेण्यात आलेल्या आढाव्यानंतर पालिका अधिकाऱ्याने सांगितले. यात सध्या सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे दरदिवशी ५५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे. दरदिवशीप्रमाणे महिन्याभराचा विचार केल्यास सुमारे १६ हजार ५०० लिटर पाण्याची बचत होत आहे. येणाऱ्या काळातही पाणी कपात कायम राहणार असल्याने येत्या मे महिन्यापर्यंत सुमारे ८५ हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. यामुळे २६ दिवसांचे पाणी वाचत असल्याने ऑगस्टपयत पाणी पुरवणे शक्य होणार असल्याचे जलअभियंता विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Untitled-12