टिटवाळा स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोदान एक्स्प्रेससह अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत.
कधी ओव्हरहेड वायरवर कपडा पडल्याने तर कधी पेंटाग्राफवर छत्री वा पर्स पडल्याचे निमित्त ठरून मध्य रेल्वे उपनगरीय लोकल वेळापत्रकाचा बोजवारा उडत आहे. अशा क्षुल्लक कारणांमुळे गेल्या १० महिन्यांत मध्य रेल्वेची २१ वेळा रखडपट्टी झाली. पर्स, छत्री, कपडे अशा क्षुल्लक वस्तू रेल्वे