मश्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्याने विस्कळीत झालेली वाहतूक दिडतासाच्या व्यत्ययानंतर पूर्ववत झाली. सोमवारी दुपारी हार्बर मार्गावर वाशीकडे जाणाऱया एका लोकलचा पेंटाग्राफ मश्जिद बंदरजवळ तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बरच्या तब्बल ३२ गाड्या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. परिणामी, रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, हार्बर मार्गावरील काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी मध्ये रेल्वेच्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local railway
First published on: 18-07-2016 at 15:21 IST