मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्या एका ट्विटमुळे चर्चेत असून वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. वाद निर्माण होताच किशोरी पेडणेकर यांनी हे ट्विट डिलीट केलं होतं. दरम्यान या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं अशी माहिती दिली आहे. या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांना या वादासंबंधी प्रश्न विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं”.
“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात
“ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आपल्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी आपण तसं वागू नये या मताची मी आहे. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं. तसंच त्या मुलाला परत माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं”, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
The lady in below tweet is Mumbai Mayor @KishoriPednekar
When asked who got the Vaccination Contract in @mybmc
She answers “तुम्हारे बाप को ”
This is an insult to all #Mumbaikars waiting for Vaccination #ShivSenaInsultsMumbaikars pic.twitter.com/nif3GztZi7
— Devang Dave (@DevangVDave) June 2, 2021
“आता तर मला धडा मिळाला. कोणी किती जवळचा असला तर त्याच्याकडे मोबाइल देऊ नये हा धडाच यानिमित्ताने मिळाला आहे. आज ट्विट केलं आहे, उद्या काहीही होऊ शकतं,” अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.
काय आहे नेमकं प्रकरण –
किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.
“…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील!” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत!
या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं होतं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.