scorecardresearch

Premium

मुंबई : प्रदूषणविषयक तक्रारींसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार

मुंबईत होणाऱ्या प्रदूषणाविषयी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून एक मदत क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

Mumbai mnc whatsapp number
मुंबई : प्रदूषणविषयक तक्रारींसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मुंबईत होणाऱ्या प्रदूषणाविषयी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून एक मदत क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर छायाचित्रासह प्रदुषणविषयक तक्रार करता यावी यासाठी एक स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना खड्ड्यांप्रमाणेच प्रदूषणविषयक तक्रारी मोबाइल क्रमांक ८१६९६८१६९७ वर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे करता येणार आहे.

मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीला आता एक महिना पूर्ण झाला आहे. मुंबईतील हवेचा स्तर बिघडल्यामुळे गेल्या महिन्यात महानगरपालिका प्रशासनाने बांधकामाच्या ठिकाणी अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि त्यामुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न केल्यामुळे महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांनी संबंधित बांधकामांना आधी इशारा वजा नोटीसा (इंटिमेशन) धाडल्या होत्या. त्यानंतरही नियम न पाळणाऱ्या बांधकामांना काम थांबविण्याची नोटीसा दिली होती. काम थांबविण्याबाबत दिलेल्या नोटीसची संख्या वाढत असून महानगरपालिकेच्या नियमावलीला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी शासकीय प्राधिकरणांना पुन्हा एकदा नियमावलीचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी हे नियम तयार करण्यात आले असून त्याचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करावी, तसेच वेळप्रसंगी पोलिसात गुन्हे दाखल करावे, असे निर्देश महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने दिले आहेत.

Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
mira bhaindar municipal corporation marathi news
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात तक्रार
mumbai municipal corporation marathi news, umbai municipal corporation fd break marathi news,
विश्लेषण : ‘एफडी’ मोडण्याची वेळ मुंबई महापालिकेवर का आली? राखीव निधीचा वापर योग्य की अयोग्य?

हेही वाचा – मुंबईत वीस टक्के दुकानांच्या पाट्या अद्यापही मराठीत नाहीत

हेही वाचा – २६/११ ला दहशतवादी पाहिल्याचा पोलिसांना दूरध्वनी; माहिती खोटी असल्याचे निष्पन्न

गुन्हे दाखल करताना कोणत्या प्राधिकरणाची हद्द आहे याचा विचार न करता सरळ गुन्हे दाखल करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून प्रशासनाने आता नागरिकांनाही सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे.आपल्या परिसरात कुठेही प्रदूषण होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत तक्रार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यात मोबाइल ॲप, महानगरपालिकेचे संकेतस्थळ, नागरी मदत क्रमांक आणि एक व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांना महानगरपालिकेच्या संकेतस्थळाबरोबरच ‘माय बीएमसी २४ बाय ७’ या मोबाइल ॲपवर किंवा १९१६ या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai mnc whatsapp number for pollution complaints mumbai print news ssb

First published on: 27-11-2023 at 19:25 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×