मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाची दखल घेत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दुपारी २ वाजता सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र बैठकीत मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय आरोग्य सेविका व आशा सेविकांनी घेतला आहे. दरम्यान, मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही बुधवारी बैठक होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन, प्रसूतीविषयी फायदे, गटविमा योजना लागू करावी किंवा १५ हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता द्यावा, दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत वेतन मिळावे, महापालिकेच्या आरोग्य सेविकांच्या रिक्त जागांवर आशा सेविकांची नियुक्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासून तीन हजारांहून जास्त आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते.

pune bhaubeej marathi news
पुणे: भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीला जीवदान, अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी

हेही वाचा – पावसात झाडांखाली थांबू नये, मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन

हेही वाचा – चौपाट्यांवर तैनात सुरक्षा रक्षक मूलभूत सुविधांपासून वंचित, सुविधा उपलब्ध करण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

आंदोलनाची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी दिला होता. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मंगळवारी प्राथमिक चर्चा करून बुधवारी दुपारी सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आणि म्युनिसिपल आशा सेविका युनियनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही बुधवारी बैठक होणार आहे. मात्र मागण्यांबाबत योग्य निर्णय होईपर्यंत आशा सेविका आणि आरोग्य सेविकांचे आदोलन सुरू राहील, असे ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.