वांद्रय़ातील खेरवाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून जून महिन्यात तो खुला करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. खेरडवाडी येथे ५८० मीटर लांब व २५ मीटर रूंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दक्षिण मुंबईकडे व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना त्याचा मोठा उपयोग होईल. या उड्डाणपुलाचे बांधकाम ३१ मे पर्यंत संपण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर अखेरचा हात फिरवून जून महिन्यात या पुलाची दक्षिणेकडील बाजू मुंबईकरांसाठी खुली करण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न असल्याचे प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साडेसहा कोटींच्या हिरेचोरी प्रकरणी सहा जणांना अटक
मुंबई : साडेसहा कोटी रुपयांच्या हिरेचोरी प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश असून चोरीला गेलेल्या एकूण हिऱ्यांपैकी पाच कोटी रुपयांचे हिरे हस्तगत केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. आरोपींना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उदयभान सिंग, ओमप्रकाश सिंग, राजेश सरोज, धीरज सिंग, बिपीन सिंग आणि सावित्री ठाकूर अशी आरोपींची नावे असल्याची माहिती सहआयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी दिली.  एस. आर. सिक्युरिटीजचा निरीक्षक रमेशकुमार गुप्ता  ९ मे रोजी साडेसहा कोटींचे हिरे घेऊन सूरतहून बोरिवली स्थानकावर दाखल झाले होते. हे हिरे ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलेल्या आरोपी उदयभान याने साथीदारांच्या मदतीने हिरे चोरले होते.

अक्षरधाम हल्ला :  निदरेष सुटलेल्या आरोपींची नुकसानभरपाईची मागणी
मुंबई : अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविलेल्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केलेल्या सहा आरोपींना गुन्ह्यात गोवल्याबाबत गुजरात सरकारकडून आता नुकसान भरपाई हवी आहे. सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ‘जमैत उलेमा’ या संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदम अजमेरी, मुफ्ती अब्दुल कय्यूम मन्सुरी, मोहम्मद सलीम शेख, अब्दुलमियाँ कादरी आणि अल्ताफ हुसैन हे या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले सहापैकी पाचजण हजर होते. या प्रकरणामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai news news in mumbai mumbai city news
First published on: 27-05-2014 at 02:56 IST