मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला आलेल्या तरूणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. रांग तोडून दर्शनासाठी जाणाऱ्या नंदिनी गोस्वामी या तरुणीला बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे चित्रण समाजमाध्यमांतून समोर आले होते. महिला पोलिसांच्या या ‘दबंगगिरी’वर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. तर, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. नंदिनी गोस्वामीनेही पुढे येऊन आपल्याला पोलीस ठाण्यात नेऊन दांडुक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचे. तसेच, तिच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर आज याप्रकरणाशी संबंधित दोन महिला पोलीसांना निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘लालबागचा राजा’च्या मंडपात तरुणीला मारहाणीप्रकरणी दोन महिला पोलीस निलंबित
नंदिनी गोस्वामी या तरुणीला बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांकडून बेदम मारहाण
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 29-09-2015 at 16:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police beaten up a devotee at lalbaugcha raja two lady constable suspended