मुंबई : शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहावयास मिळत असून मंगळवारी दिवसभरात १,७८१ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या १० लाख ९७ हजार ७३५ वर पोहोचली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५८६ वर पोहोचली. मृत व्यक्ती वयोवृद्ध होती व त्यांना उच्च रक्तदाब, हृदयरोग व मधुमेह हे दीर्घकालीन आजार होते. दरम्यान, दिवसभरात १,७२३ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत एकूण १० लाख ६४ हजार ३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या १४ हजार १४६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७ टक्के आहे, तर रुग्णदुपटीचा दर ३६९ दिवस आहे.

राज्यात ३,६५९ बाधित

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येतील घट कायम असून मंगळवारी राज्यात ३,६५९ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर ३,३५६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी मुंबईतही रुग्णसंख्या दोन हजारांच्या खालीच राहिली आहे. चाचण्या कमी होत असल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. राज्यात, मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण ८५ वर्षांचा असून या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होता. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या जवळपास २५ हजारांच्या घरात गेली आहे.

ठाणे जिल्ह्यात ७५६ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ७५६ करोना रुग्ण आढळून आले. नवी मुंबईत २७१, ठाणे २६७, कल्याण- डोंबिवली ९२, मीरा-भाईंदर ५९, ठाणे ग्रामीण ४६, उल्हासनगर ९, बदलापूर सात आणि भिवंडी पालिका क्षेत्रात पाच रुग्ण आढळून आले आहेत, तर जिल्ह्यात सद्यस्थितीत करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ही ५,५१४ आहे.