मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढऱ्या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली. मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी जादा १०० रुपये, शिर्डीसाठी जादा २०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबई ते पुणे प्रवासासाठी वातानुकूलित आणि साध्या टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त ५० रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

मुंबई-नाशिक मार्गावरील वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ४७५ रुपयांवरून ६३५ रुपये होणार आहे. तर, आणि मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ५७५ रुपयांवरून ८२५ रुपये होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील साध्या टॅक्सीचे भाडे ४५० रुपयांवरून ५०० रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीचे भाडे ५२५ रुपयांवरून ५७५ रुपये असेल.

Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन भाडे सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे. भाडेवाढ कधी लागू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली नाही. मात्र पुढील महिन्यापासून सुधारित भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे, असे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. सुधारित भाडे मुंबईतील दादर येथे असलेल्या त्यांच्या टॅक्सी थांब्यावर ठळकपणे लावण्याचे निर्देश दिले आहेत.