मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता आणि पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माध्यम शिक्षण – समस्या, आव्हाने आणि भवितव्य’ या विषयावर दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद २९ ते ३० सप्टेंबर रोजी विद्यापीठात होणार आहे.
जागतिक स्तरावर संचार क्रांतीने मोठय़ा प्रमाणावर बदल घडवून आणले आहेत. शैक्षणिकदृष्टय़ा या संचार क्रांतीचे प्रतििबब माध्यम शिक्षणामध्येही कालपरत्वे उमटू लागली आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, संवादाच्या परिभाषा आणि संकल्पना बदलू लागल्या, आहेत. याच उद्देशाने कालपरत्वे माध्यम शिक्षण हे कसे असावे, माध्यमांसमोरील आव्हाने आणि माध्यममांचे भवितव्य कसे असणार यांवर सखोल विवेचण आणि चर्चा यामध्ये घडविण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे पत्रकारीता अभ्यासक्रम प्रमुख सुंदर राजदीप यांनी स्पष्ट केले. या परिसंवादात सहभागी होण्यासाठी डॉ सुंदर राजदीप यांच्याशी ९९६९१४५३५० वर किंवा प्रा. दैविता पाटील यांच्याशी ९८१९५५५४४२ वर संपर्क साधवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university organized seminars on medium education problems challenges and future
First published on: 23-09-2014 at 04:15 IST