कृषिमंत्र्यांना भेटू द्यावे, अन्यथा उडी मारेन अशी धमकी देत शुक्रवारी दुपारी एक तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर पोहोचला. अथक प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले असून यामुळे मंत्रालयाच्या आवारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी दुपारी एक तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला. सातव्या मजल्यावर खिडकी बाहेरील सज्जावर तो उभा राहिला. मला कृषिमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटू द्यावे, अन्यथा इथून उडी मारेन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. तरुणाच्या या इशारानंतर सुरक्षा यंत्रणाही कामाला लागल्या. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मंत्रालयात तैनात असलेले पोलीस अधिकारी त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मंत्रालयाजवळ बघ्यांची गर्दीही वाढत होती. या घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे हेदेखील तिथे पोहोचले.

दरम्यान, हा तरुण सातव्या मजल्यावर सज्जापर्यंत कसा पोहोचला, असा प्रश्नही निर्माण झाला. तो तरुण कोण आहे, तो मंत्रालयात कशासाठी आला होता याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकते. सातव्या मजल्यावरील सज्जावर पोहोचल्यानंतर त्या तरुणाने आपला मोबाईल फोन खाली फेकला, असे सांगितले जाते. तो तरुण उस्मानाबादचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai youth threatens to jump from seventh floor mantralaya want to meet agriculture minister high voltage drama
First published on: 10-11-2017 at 17:27 IST