सरत्या वर्षांला निरोप देतानाच नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात कोणतीही कुचराई राहू नये यासाठी ‘पार्टी फर्स्ट’बहाद्दरांनी जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र मंगळवारी मुंबई व ठाणे परिसरात होते. ढाबे, नाक्यावरचे हॉटेल, त्रि-पंच-सप्त तारांकित हॉटेल, सोसायटीची गच्ची इतकेच नव्हे घराघरांत या जल्लोषी स्वागतासाठी काय आखणी करायची याचीच चर्चा होती. व्हॉट्सअॅपवर तर ‘मद्यधुंद’ संदेशांचा महापूर आला होता. नववर्षांच्या स्वागतानंतर घरी सुरक्षित जाता यावे यासाठी शहरातील फ्लीट टॅक्सींचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. तर मध्य व पश्चिम रेल्वेनेही प्रत्येकी गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेत ‘पार्टी फर्स्ट’बहाद्दरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
व्हॉट्सअॅप फुल्ल
 वर्षांअखेरच्या दोन दिवस आधीपासूनच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वर्षअखेरीच्या दारू पाटर्य़ावर संदेश फिरू लागले. यामुळे व्हॉट्सअॅपच्या आयकॉनवरील संदेशांचा आकडा तासाभराच्या अवधीत शंभरी पार करू लागला. एरवी दारू या शब्दापासून दूर असलेल्या अनेकांनीही या संदेशवाचनाची मजा घेत ते आपल्याकडील सर्वच ग्रुप्सवर फॉरवर्ड करण्यास सुरुवात केली. पाटर्य़ाच्या या संदेशांमुळे धकाधकीतून थोडीशी विश्रांती मिळत होती तर दुसरीकडे नववर्ष स्वागताचा माहोलही तयार होत होता. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी शुभेच्छा देणाऱ्या संदेशांचा संग्रह अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे नव्या वर्षांत आपल्याला संदेशांची अजिबात कमतरता नसेल हे नक्की. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मध्य रेल्वेने १६०० जवान तैनात केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे सुरक्षा जवानांसह श्वानपथकही स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्था पाहणार आहे. तसेच अन्न वा मद्यातून भेसळ होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे २०० अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

हॉटेल मालक किंवा बार मालक यांनी टॅक्सींची सोय केल्याने या मालकांनी आरक्षित केलेल्या टॅक्सींची संख्या दीड ते दोन हजारांच्या घरात गेली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikar ready to welcome new year with a blast
First published on: 31-12-2014 at 02:34 IST