दादर येथील बाबरेकर मार्गावरील एका इमारतीत राहणाऱ्या मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात कपडे धुण्याच्या धोपटण्याने वार करुन हत्या केली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
बाबरेकर मार्गावरील एश्लेन रोड येथील गोपाळधाम या इमारतीत रेखा संघवी (६६) आणि त्यांचा मुलगा तेजस (३७) हे दोघे राहात होते. रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास तेजसने रेखा यांच्या डोक्यात कपडे धुण्याच्या धोपटण्याने प्रहार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.