राज्यात सध्या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण, आर्यन खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईतल्या ज्या क्रूझवर ही ड्रग्ज पार्टी करण्यात आली होती, त्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. अटक करणारे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता एक नवी माहिती दिली आहे. मुंबईतल्या या पार्टीला राज्य सरकारची परवानगी नव्हती, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलिक यांनी समीर वानखेडे आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाविषयी आणखी काही आरोप करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी या पार्टीमध्ये समीर वानखेडे यांच्याशी मैत्री असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाही सहभागी झाल्याचा आरोप केला. तसंच या पार्टीसाठी कोविड प्रोटोकॉल असूनही शासनाची परवानगी घेण्यात आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – “क्रूझ पार्टीत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाचे वानखेडेंशी संबंध”; नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, “ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोविड प्रोटोकॉल असूनही महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आलं. पण माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik mumbai cruise drug party no permission asked to state government vsk
First published on: 27-10-2021 at 11:39 IST