आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा करणारे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर यांच्या लग्नातील एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. समीर वानखेडेंचा पहिला विवाह कधी आणि कुठे झाला होता यासंदर्भातील माहितीही नवाब मलिक यांनी दिलीय.

गुरुवारी, ७ डिसेंबर २००८ रोजी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये केलाय. तसेच मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती. समीर यांची थोरली बहीण जास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खानांनी यावी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केलेली, असा दावा मलिक यांनी केलाय.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

याचप्रमाणे नवाब मलिक यांनी एक फोटो ही ट्विट केलाय. मलिक यांच्या दाव्यानुसार हा फोटो या निकाहमधील असून फोटो दिसणारी व्यक्ती समीर वानखेडे आणि त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी आहेत.

समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा आणि वानखेडेंचं उत्तर…
समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर वानखेडे यांनी हा दावा खोडून काढला होता. ” माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी मलिक यांनी पहिल्यांदा फोटो ट्विट केला तेव्हा पत्रक जारी करत म्हटलं होतं.

वैवाहिक आयुष्याबद्दल वानखेडे म्हणाले होते…
“मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले,” असं वानखेडे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितलं होतं.

आज मुंबईत चौकशी…
दरम्यान, मंगळवारी समीर वानखेडे यांनी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत येणार आहेत. समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला जातील. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत.