सॅम डिसूझा आणि एनसीबी अधिकारी व्ही व्ही सिंग यांच्यातील कथित टेलिफोनिक संभाषण लीक झाले होते ते फोन टॅपिंगचे परिणाम असू शकतात, असा संशय मुंबईतील एनसीबी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. आर्यन खानचा समावेश असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पैसे दिल्याच्या आरोपात सॅम डिसूझाचे नाव समोर आले आहे.

एनसीबीला ‘फोन टॅपिंग’चा संशय आहे. रविवारी नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी व्हीव्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यातील फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप शेअर होती. यामागे फोन टॅपिंगचा संशय एनसीबीने व्यक्त केला आहे. एनसीबीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, जून २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या निवृत्त एसीपीच्या मुलावर कारवाई करण्यात आली होती, कदाचित त्यामुळेच व्हीव्ही सिंग यांचा फोन टॅप होत असावा.

“जूनमध्ये सेवानिवृत्त एसीपीचा मुलगा श्रेयस कांजळे याच्याकडून एलएसडीचे ४३६ डाग जप्त करण्यात आले होते आणि त्याला अटक करण्यात आली होती. म्हणूनच कदाचित तेव्हापासून टॅपिंग होत असेल. मात्र, सॅम डिसूझा यांच्याकडून ते लीक झाले असावे, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठेवली आहे.”, इंडीया टूडेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 

ऑडिओ क्लिपमध्ये काये होते?

या प्रकरणी नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या क्लिपमध्ये सॅम डिसूझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. यामध्ये सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटिस पाठवल्याबाबत विचारणा केली. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नसल्याने मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटले. तसेच तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमईआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय असे म्हटले.