राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे आज भगवदगीतेतील एक श्लोक म्हणताना अडखळले. ‘यदा यदा शी धर्मस्य’ असा उल्लेख त्यांनी केला. त्यांची जीभ घसरल्यावर पत्रकारांनी त्यांना श्लोक म्हणून दाखवा असे म्हटले. ज्यावर जितेंद्र आव्हाड चांगलेच पत्रकारांवर भडकले. तुम्ही इथे भाजापचे प्रवक्ते म्हणून आलात का? असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी खासगीत संपूर्ण गीता म्हणून दाखवण्याचे आव्हानही स्वीकारले. मात्र त्यांच्या आक्रमक वक्तव्याची आणि त्यांच्या चुकलेल्या श्लोकाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला. त्यावरून वाद सुरू झाला आहे. भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली. दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हानच दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad sleep of tongue on bhagavad gita
First published on: 12-07-2018 at 16:35 IST