राष्ट्रवादीचे नेते भाजपाला समर्थन देण्यासाठी अमित शहा यांना भेटले, अशा ऐकीव माहितीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं. ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याला कोणताही आधार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेत महेश तपासे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा खोडून काढला आहे.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?

“राष्ट्रवादीचे विचार सेक्यूलर, समतावादी, समाजवादी आहेत. त्यामुळे भाजपाबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही झालेली नाही. म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी चुकीचे विधान करु नये,” असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपाबरोबर जाण्यासाठी दबाव असल्याने शरद पवारांनी निवृत्ती घेतली? जयंत पाटील म्हणाले…

“शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार? याबाबत अनेक वर्तमानपत्रांनी सर्व्हे केला. पण, महाविकास आघाडी एकत्रित, एकदिलाने आणि एकविचाराने ताकदीने उभी राहत भाजपाला हद्दपार करणार आहे,” असं महेश तपासे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर बोलणी सुरू”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्यापूर्वी विधानपरिषदेच्या निकाल लक्षात घेता सगळीकडे महाविकास आघाडीला विजय मिळत आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीचा परिणाम होणार नाही. उलट महाविकास आघाडी आणि देशपातळीवर भाजपा विरोधात असलेले लहानमोठे पक्ष एकत्र करण्यास ताकद मिळणार आहे,” असेही महेश तपासे म्हणाले.