मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघाताच्या प्रकरणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे कुलाब्यातील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. हा अपघात नसून हे व्यवस्थेचे अपयश असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. नार्वेकर यांनी या प्रकरणी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे.

हेही वाचा – स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस; अलिबाग, घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग निश्चित करण्याची पर्यटकांची मागणी

हेही वाचा – बेकायदा राजकीय फलकांची वाढती संख्या भयावह; राजकीय पक्षांना अवमान नोटीस बजावताना उच्च न्यायालयाची उद्विग्नता

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या नील कमल बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचे आता पडसाद उमटू लागले आहेत. कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी गुरुवारी राज्य सरकारला पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जेट्टीवर नेहमीच प्रवाशांच्या बाबतीत हलगर्जी केली जाते. त्यामुळे ही दुर्घटना म्हणजे अपघात नसून हे व्यवस्थेचे अपयश आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.