गोदावरी नेमकी किती प्रदूषित झाली आहे याची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन आठवडय़ात विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत.
जुलै महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले.
प्रदूषणामुळे गोदावरी ‘मृत’ होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करीत आगामी कुंभ मेळ्याच्या पाश्र्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने आदेश देण्याची मागणीही नाशिक येथील नागरिकांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. सुरेश गुप्ते यांच्या खंडपीठाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.