मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नीट पीजी २०२४ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नीट पीजीची परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार होती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नीटी पीजी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा पदव्युत्तर (NEET PG) आता २३ जून रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, वैद्यकीय समुपदेशन समिती, आरोग्य विज्ञान महासंचालनालय आणि वैद्यकीय विज्ञानांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळ यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार नीटी पीजी २०२४ च्या प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ५ ऑगस्ट १५ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. पात्रतेसाठी कट ऑफची तारीख १५ ऑगस्ट २०२४ असेल. नवीन शैक्षणिक सत्र १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा >>> गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली १०० कोटींची फसवणूक;आरोपीचा शोध सुरू

तसेच महाविद्यालयात रूजू होण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर आहे. नीट पीजी २०२४ ची परीक्षा प्रथम ३ मार्च रोजी घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर परीक्षा ७ जुलै रोजीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता पुन्हा परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण (सुधारणा) विनियम २०१८ च्या नवीन नियमांनुसार नीट पीजी परीक्षा पदव्युत्तर वैद्यकीय कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी नेक्स्ट कार्यरत होईपर्यंत सुरू राहील. नेक्स्ट हे २०२५ मध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी नेक्स्ट परीक्षा २०२३ मध्ये सुरू होणार होती.