लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: अंमलीपदार्थ विक्रीबाबत आलेल्या दूरध्वनीची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर नायजेरियन नागरिकाने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार मोहम्मद अली रोड परिसरात घडला. या हल्ल्यात पोलिसाच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पायधुनी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

mumbai crime news, 23 year old boy attack police marathi news
मुंबई: पोलिसाला मारणारा अटकेत
Fact check
Fact Check : प्रचारादरम्यान भाजपा नेत्यावर हल्ला? VIDEO होतोय व्हायरल, जाणून घ्या नेमकं खरं काय…
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

पायधुनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक घोरपडे कार्यरत असून घोरपडे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम ३५३, ३३३ व ३३२ अंतर्गत पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पायधुनी पोलीस ठाण्यातील मोबाइल व्हॅन क्रमांक १ मध्ये मंगळवारी रात्रपाळीत घोरपडे कार्यरत होते. अंमलीपदार्थ विक्रीबाबत आलेल्या दूरध्वनीची शाहनिशा करण्यासाठी घोरपडे मोहम्मद अली रोडवरील धोबी स्ट्रीट परिसरात गेले होते. याबाबत त्यांनी आरोपी हेन्री देहचिडू बेम (२६) याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी आरोपी बेमने चाकूने घोरपडे यांच्यावर हल्ला केला.

आणखी वाचा- सीएसएमटी- नरिमन पॉइंटदरम्यान बेस्टची नवी वातानुकूलित बस सेवा

या हल्ल्यात घोरपडे यांच्या डाव्या हाताला जखम झाली. हल्ल्या होताच इतर पोलिसही पुढे सरसावले असता आरोपीने त्यांनाही धमकावले. हल्ल्यानंतर घोरपडे यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. याप्रकरणी घोरपडे यांच्या तक्रारीवरू गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पायधुनी पोलिसांनी आरोपी बेमला अटक केली. बेम अमन हॉटेलसमोर वास्तव्याला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपीच्या अंमलीपदार्थ तस्करीतील सहभागाबाबतही पोलीस तपास करीत आहेत.