शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या कुटुंबियांना देत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. रविवारी राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी आणि चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेत असताना त्यांच्या आईला मारलेल्या मिठीचा व्हिडीओ समोर आल्यापासून राऊत यांच्या आईंबद्दलही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये याच विषयावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी रविवारी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. रविवारी सकाळी सात वाजता ईडीची टीम संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवास्थानी पोहोचली होती. या ठिकाणी तब्बल नऊ तास संजय राऊत यांच्यसह त्यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. नऊ तासानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन पुन्हा चौकशी देखील करण्यात आलीय अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. राऊत यांच्या आईचे घराच्या खिडकीत उभं राहून आश्रू पुसतानाचे फोटो समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती सोमवारी सकाळी समोर आल्यानंतर निलेश राणेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली होती. “दुसऱ्यांच्या घरात पण आई असते. मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत यांनी विसरता कामा नये,” असा टोला निलेश राणेंनी लगावला. याच ट्विटमध्ये पुढे निलेश राणेंनी, “हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो,” असंही म्हटलं.

संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे त्यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी गेले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईची भेट घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांनादेखील धीर देण्याचा प्रयत्न केला. ”संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे”, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane tweets about sanjay raut mother says next may be uddhav thackeray and family scsg
First published on: 02-08-2022 at 08:37 IST