आजपासून आणखी ७५३ फे ऱ्या; राज्य सरकार व रेल्वेच्या वादात सर्वासाठी उपनगरी सेवेचा निर्णय नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सामान्यांसाठी उपनगरी रेल्वे प्रवासावरून गेले चार दिवस चर्चा होत असतानाच मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मात्र लोकल फे ऱ्यांमध्ये वाढ के ली जात आहे. परंतु सामान्यांसाठी हा प्रवास कधी असा सवाल उपस्थित झाला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून  ६१० लोकल फे ऱ्यांची भर पडल्यानंतर सोमवारपासून आणखी ७५३ फे ऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवर एकू ण २ हजार ७७३ लोकल फे ऱ्या असतील. टाळेबंदीआधी ३ हजार १४१

फे ऱ्यांमधून ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. आता ८८ टक्के  फे ऱ्या होऊनही प्रवासी मात्र जेमतेमच आहेत. राज्य सरकार व रेल्वेकडून सामान्यांना प्रवासासाठी अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही.  २१ ऑक्टोबरला सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाने रेल्वे, पोलीस, प्रवासी संघटना व अन्य विभागांची बैठक बोलावली. त्यानंतर २२ आणि २७ ऑक्टोबरला राज्य सरकार व रेल्वे प्रशासनात बैठक झाल्यानंतर २८ ऑक्टोबरला राज्य सरकारने सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत रेल्वेला पत्र पाठवले. रेल्वेने सज्ज असल्याचा दावा करतानाच करोनाकाळातील नियमानुसार एका लोकलमधून के वळ ७०० प्रवासी याप्रमाणे २२ लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचे राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात उत्तर दिले आणि वाढणारे प्रवासी, समस्यांचा पाढाच वाचला. त्यानंतर राज्य सरकारकडून मात्र प्रतिसाद आलेला नाही.

सामान्यांसाठी लोकल चालवण्यास रेल्वे सज्ज असल्याचा दावा करत १ नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने ६१० लोकल फेऱ्या वाढवल्या. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या २,०२० झाली. परंतु रविवारी पुन्हा एकदा लोकल फे ऱ्या वाढवण्यासंदर्भात रेल्वेकडून हालचाली सुरू  झाल्या आणि २ नोव्हेंबरपासून आणखी ७५३ फे ऱ्यांची भर पडत आहे. ७५३ फे ऱ्यांमध्ये ५५२ फे ऱ्या मध्य रेल्वेवर असल्याने या मार्गावरील फे ऱ्यांची संख्या १,५७२ पर्यंत पोहोचली आहे. तर पश्चिम रेल्वेवर २०१ फे ऱ्या वाढणार असल्याने एकू ण फे ऱ्या १,२०१ होतील. या फे ऱ्या जरी वाढल्या, तरीही सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत मात्र निर्णय झालेला नाही.

* टाळेबंदीआधी मध्य रेल्वेवर दररोज १,७७४ लोकल फे ऱ्या होत होत्या. आता याच फे ऱ्यांची संख्या १,५७१ पर्यंत, तर पश्चिम रेल्वेवर १,३६७ फे ऱ्यांपैकी १,२०१ फे ऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.

* जवळपास ८८ टक्के फे ऱ्या होणार आहेत. सध्याच्या घडीला ९ लाख प्रवासी आहेत.

* सर्वासाठी लोकल सुरू के ल्यास करोनाकाळातील नियमाप्रमाणे एका लोकल फे रीतून ७०० प्रवासी याप्रमाणे एकू ण ३,१४१ फे ऱ्यांमधून २२ लाख प्रवाशांनाच प्रवास देऊ शकतो. त्यामुळे सध्या सर्वासाठी प्रवास  (८० लाख प्रवासी ) अशक्य असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

रेल्वेची भूमिका सकारात्मक राहिली

आहे. रेल्वेची तयारी नेहमीच होती. त्यामुळे वेळोवेळी लोकल फे ऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. २२ लाख प्रवाशांची वाहतूक आणि अन्य मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी बैठकीसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी के ली आहे. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

 

.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No local trains for common people even after service increased zws
First published on: 02-11-2020 at 00:28 IST