‘स्वाभिमान’ संघटनेचा माजी कार्यकर्ता चिंटू शेख याच्यावरील गोळीबाराचे नीतेश राणे यांच्याविरुद्धचे प्रकरण बंद करण्याबाबतचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दुसऱ्यांदा सादर केलेला अहवालही महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावत नीतेश यांना दणका दिला आहे. यापूर्वीही अशाप्रकारचा अहवाल फेटाळून लावण्यात आल्याचे आणि प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण महानगरदंडाधिकाऱ्यांनी सीबीआयचा दुसरा अहवाल फेटाळताना प्रामुख्याने दिले आहे.
शेखशी न्यायालयाबाहेर तडजोड झाली आहे. तेव्हा याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी नीतेश यांनी उच्च न्यायालयात केली होती. याबाबत अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती या वेळी सीबीआयने दिलह होती. त्यानंतर नीतेश यांच्याविरुद्धचे प्रकरण बंद करण्याचा अहवाल सीबीआयने गेल्या महिन्यात दिला होता़