घाटकोपर येथे ७२ इंच जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २८ ते २९ मे या एक दिवसासाठी एल आणि एन विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २८ मे रोजी सकाळी दहा वाजता काम सुरू होणार असून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत चालणार आहे. एल विभागातील साने गुरुजी नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, हिल क्रमांक २, जंगलेश्वर महाराज मार्ग, मोहिली पाईप लाइन मार्ग आणि एन विभागातील आनंदनगर पार्कसाइट, विक्रोळी पार्क साइट, रामनगर, गोळीबार मार्ग, भीमनगर, कातोडी पाडा, भटवाडी, बर्वे नगर, सिद्धार्थ नगर, चिराग नगर, पारशी वाडी, काजू टेकडी, सवरेदय नगर व नारायणनगर येथे या कालावधीत २४ तासांसाठी पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
कुर्ला-घाटकोपरमध्ये बुधवारी पाणी नाही
घाटकोपर येथे ७२ इंच जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २८ ते २९ मे या एक दिवसासाठी एल आणि एन विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
First published on: 24-05-2014 at 03:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water for kurla ghatkopar on wednesday