कारवाई गृहविभागाकडून
मुंबई : किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे चित्र सोमवारी समोर आले. सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री  कार्यालयाचा

काहीही संबंध नाही. गृहविभागाने ती कारवाई के ल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट के ले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही त्यास दुजोरा देत सरकारमधील समन्वयाच्या प्रश्नावरून सारवासारव के ली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि महाविकास आघाडीवर किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. किरीट सोमय्यांवरील कोल्हापूर जिल्हाबंदीच्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नाही. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखणे हे प्रशासन व पोलिसांचे काम असून गृहविभाग-पोलिसांना त्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार गृह विभागाने ही कारवाई के ल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच आपल्या राज्यात आणि देशात लोकशाही आहे. कोणालाही काहीही आरोप करण्याचा अधिकार आहे. आरोप करणाऱ्याच्या तोंडाला कोणी टाळे लावू शकत नाही. त्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात. आरोप कोणावरही होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कं पन्या विक्रीला काढून देशच विकायला काढल्याचा आरोप होतो आहे. पण आरोपांमुळे सरकार पडत नाही. महाविकास आघाडी सरकार घाबरट नाही, असे राऊत म्हणाले.

सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही असे विधान राऊत यांनी के ल्यानंतर आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची व सोमय्या यांच्यावरील कारवाईवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही सोमय्या यांच्यावरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचे स्पष्ट के ले. स्थानिक परिस्थितीनुसार गृहविभागाने निर्णय घेतल्याचे सांगत तो निर्णय राजकीय नव्हे तर प्रशासकीय असल्याचे सूचित केले.