आपल्या घराच्या आसपास धार्मिक उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषण होत असेल तर नेमकी तक्रार कुठे करायची हे नागरिकांना कळत नाही. मुंबई पोलिसांनी अशा तक्रारी करण्यासाठी पोलीस नियंत्रणक कक्ष, संकेतस्थळ, ट्विटर याचबरोबर लघुसंदेशाचे माध्यमही उपलब्ध करुन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धार्मिक उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग झाल्यास त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, याची विचारणा उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकदरम्यान केली होती. त्याच्या उत्तरादाखल, मुंबई पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्ष, पोलिसांचे संकेतस्थळ याचबरोबरीने ट्विटर हँडल आणि लघुसंदेश करण्याचे दोन क्रमांकही उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now u can registered sound pollution complaint
First published on: 28-05-2016 at 01:58 IST