scorecardresearch

Premium

गणेश विसर्जनामुळे बेस्टच्या फेऱ्या खंडित

परिणामी, प्रवाशांची गैरसोय झाली.

fifth day, several rounds BEST interrupted Saturday afternoon immersion Gauri-Ganpati mumbai
गणेश विसर्जनामुळे बेस्टच्या फेऱ्या खंडित (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई: पाचव्या दिवशी गौरी – गणपतीच्या विसर्जनासाठी शनिवारी दुपारपासून बेस्टच्या अनेक फेऱ्या खंडित करण्यात आल्या. काही मार्गांवरील बस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. परिणामी, प्रवाशांची गैरसोय झाली.

भाईंदर येथे गणेश विसर्जनामुळे बस मार्ग क्रमांक सी ७२, ७०६, ७०७, ७०९, ७१०, ७१८, ७२० ची सेवा दुपारी ३ पासून खंडित करण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लालबाग परिसरात गणेश दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्यामुळे पोलिसांनी रस्ता बंद केला होता.

uran potholes and dust on the road, uran people suffer due to potholes, dust due to potholes in uran
उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना
Increase malfunction NMMT's electric buses Uran Passengers suffering buses are stopping on the road nmmc
उरण मध्ये एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बसच्या नादुरुस्तीत वाढ; भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त
Mumbai Local Video System To Pick Up Trash Garbage Thrown by Passengers From Train You Will Think Twice While Travelling
मुंबई लोकलच्या मार्गावर नवी सिस्टीम; ट्रेनमधुन कचरा टाकताना पुढच्या वेळी दोनदा विचार कराल, Video पाहा
navi mumbai bus
नवी मुंबई: अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या १२ बसवर कारवाई

हेही वाचा… शीव रुग्णालयामध्येही बोन मॅरो प्रत्यारोपण शक्य

परिणामी, अप दिशेकडे जाणाऱ्या बस मार्ग क्रमांक १, ४, ५, ६, ७, ८, ११, १५, १९, २१, २२, २५, ५१ ची सेवा दुपारी ३ पासून भायखळा पुलावरून सुरू होती. तसेच बस मार्ग क्रमांक ९, ६९, १३४ च्या फेऱ्या अप दिशेमध्ये ६७ प्रमाणे विकी हॉटेलपासून पुढे गोपाळ नाईक चौकापर्यंत होतील. तर पुढे या बसगाड्या पूर्ववत मार्गाने जातील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On the fifth day several rounds of best were interrupted from saturday afternoon for the immersion of gauri ganpati in mumbai print news dvr

First published on: 23-09-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×