‘एमसीझेडएमए’ची पालिका आयुक्तांकडे विचारणा
संपूर्ण शिवाजी पार्क ‘सीआरझेड’ क्षेत्रात मोडत असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारानंतर तेथे बांधण्यात आलेला चौथरा बेकायदा असल्याची तक्रार महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एमसीझेडएमए) करण्यात आली होती. प्राधिकरणाने या तक्रारीची दखल घेत या चौथऱ्याला कशाच्या आधारे परवानगी दिली, अशी विचारणा करीत त्याबाबत लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मंगळवारी पालिका आयुक्तांना आदेश दिले.
शिवाजी पार्क सीआरझेड क्षेत्रात मोडत असून तेथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम करता येऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर तेथे बांधण्यात आलेला चौथरा बेकायदा असल्याची तक्रार अॅड्. आभा सिंग यांनी ‘एमसीझेडएमए’कडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल
प्राधिकरणाने या चौथऱ्याची जागा नगरविकास आराखडय़ामध्ये येते का, पालिकेच्या किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने त्याला परवानगी दिली आहे का आणि नगरविकास आराखडय़ानुसार खुल्या जागेवर असा चौथरा बांधण्यास परवानगी दिली जाऊ शकते का, अशी विचारणा करीत ‘एमसीझेडएमए’ने पालिका आयुक्तांना त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.