मुंबई : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकाला डोंगरी पोलिसांनी सापळा लावून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २९ लाख रुपयांचे चरस जप्त करण्यात आले आहे.
   वाडीबंदर येथून जाणाऱ्या एका वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी इंडियन ऑईल डेपोच्या मागे सापळा लावला. ही गाडी अडवून पोलिसांनी उमर अहमद इक्बाल शेख याला अटक केली. त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्यात लपवून ठेवलेले २९ लाख रुपयांचे चरस आढळून आले. या गदारोळात त्याचा सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. शेख हा जम्मू येथून हे चरस घेऊन आला होता. कुणासाठी त्याने हे चरस आणले होते, तो कुठल्या टोळीचा हस्तक आहे का याचा पोलीस तपास करत आहेत