घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने बस थांब्यावर उभ्या असलेल्या भगवान रामचंद्र साळकर (५०) या व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तो घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथे राहणारा होता. त्या कारने रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कारलादेखील धडक दिली. वेगाने धावणाऱ्या या कारने दिलेली धडक इतकी जबर रोजी की कडेला उभी असलेली कार उलटली. उलटलेल्या कारमध्ये कारचालक विलास गोखले आणि त्यांच्यासह अन्य चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात कारचालक महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2014 रोजी प्रकाशित
कारच्या घडकेत एकाचा मृत्यू
घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने बस थांब्यावर उभ्या असलेल्या भगवान रामचंद्र साळकर (५०) या व्यक्तीला धडक दिल्याने
First published on: 13-01-2014 at 12:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed in car misshape