१५५ पदांसाठी एक लाख ३७ हजार अर्ज ; लोहमार्ग पोलीस शिपाई आणि चालकांची भरती

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून २०१९ मध्ये भरती प्रक्रि या राबविण्यास सुरुवात के ली होती.

मुंबई : वाढलेली बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थिती इत्यादी कारणांमुळे लोहमार्ग पोलिसांच्या मुंबई व पुण्यातील १५५ पोलीस शिपाई आणि चालक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी एक लाख ३७ हजार ८६२ जणांनी अर्ज सादर के ले असून या उमेदवारांची परीक्षा रविवार, १७ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. २०१९ ची ही भरती होती. करोनामुळे ती रखडली होती, अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. येत्या बुधवापर्यंत लेखी परीक्षेचा निकाल लागणार आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून २०१९ मध्ये भरती प्रक्रि या राबविण्यास सुरुवात के ली होती. मुंबईतील ६० लोहमार्ग पोलीस शिपाई, १८ चालक आणि पुणे लोहमार्ग पोलीस शिपाईच्या ७७ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. पुण्यातील लोहमार्ग पोलीस शिपाई पदासांठी ७१ हजार ९६९ अर्ज, तर मुंबईत लोहमार्ग पोलीस शिपाईच्या ६० पदासाठी ५१ हजार ६८६ अर्ज आले आणि चालक पदासाठीही १४ हजार २०७ अर्ज प्राप्त झाले. मात्र करोनामुळे आलेल्या अन्य जबाबदाऱ्या, निर्बंध आणि लोहमार्ग पोलिसांनाही झालेला करोना इत्यादी कारणांमुळे भरती थांबली होती.

निर्बंध शिथिल झाल्याने भरती पुन्हा सुरू करण्यात आली. यात पोलीस शिपाई आणि चालक पदासाठीची १०० गुणांची लेखी परीक्षा रविवारी मुंबई व पुण्यात घेण्यात आली. मुंबईतील १०६ के ंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेचा निकाल बुधवापर्यंत लागेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निकालानंतर निवड झालेल्या दोन्ही पदांच्या उमेदवारांना शारीरिक चाचणी परीक्षेला सामोरे जावे लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

अनुपस्थित अधिक

चालक पदासाठी १४ हजार २०७ अर्ज आले होते. यात लेखी परीक्षेसाठी पाच हजार ८८१ उपस्थित होते, तर आठ हजार ३२६ जण अनुपस्थित राहिले होते. करोनामुळे भरती थांबल्याने काहींना या काळात अन्यत्रही नोकरी मिळाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही जण परीक्षेला अनुपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One lakh 37 thousand applications for 155 posts of railway police zws

ताज्या बातम्या