स्वाइन फ्लूच्या साथीने राज्यातील प्रभाव वाढवला असून आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही साडेसहा हजारापेक्षा अधिक झाली आहे. दरम्यान स्वाइन फ्लूमळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील मृत्यूंची संख्या ४३ वर पोहोचली आहे.
२००९ मध्ये स्वाइन फ्लूची साथ आली तेव्हा २०१० मध्ये रुग्णांची संख्या साडेसहा हजारांवर गेली होती. स्वाइन फ्लूच्या चाचण्यांची सोय अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यानेही ही संख्या वाढली असण्याची शक्यता व्यक्त होते. आतापर्यंत ६०५ मृत्यू झाले असून त्यातील सर्वाधिक मृत्यू नागपूर शहरात नोंदले गेले आहेत. आतापर्यंत नागपूर शहरात ७०, पुणे शहरात ५०, नाशिकमध्ये ४५ मृत्यू झाले आहेत. दरम्यान स्वाइन फ्लूमुळे वांद्रे पूर्व येथील ३० वर्षांच्या तरुणाचा १९ ऑगस्टला मृत्यू झाला. त्याच्यावर २ ऑगस्टपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ८ ऑगस्टपासून स्वाइन फ्लूवरील उपचारांना सुरुवात झाली. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2015 रोजी प्रकाशित
स्वाइन फ्लूचा आणखी एक मृत्यू
स्वाइन फ्लूच्या साथीने राज्यातील प्रभाव वाढवला असून आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही साडेसहा हजारापेक्षा अधिक झाली आहे.
First published on: 26-08-2015 at 12:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more swine flu death