मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे १९२३ ला सादर केलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या पीएचडी प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने लंडनमध्ये ‘शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या इमारतीच्या मलेशिया सभागृहात या परिषदेचे उद्घाटन शनिवारी झाले. आज, रविवारी १४ एप्रिल रोजी या आंतराष्ट्रीय परिषदेचा समारोप होणार आहे.

Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

हेही वाचा >>>मोदींचे बेरोजगारीवर मौन; राहुल गांधी यांची टीका

आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अध्यक्ष आणि कुलगुरू लॅरी क्रामेर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. मनीषा करणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच लंडन आणि भारतातून ६४ संशोधक सहभागी झाले आहेत.