प्रख्यात नाक, कान, घसा तज्ज्ञ आणि समाजसेवक पद्मभूषण डॉ़ एल. एच. हिरानंदानी यांचे गुरुवारी संध्याकाळी राहत्या घरात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कांता, निरंजन व सुरेंद्रनाथ ही दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी हिरानंदानी रुग्णालयात सकाळी ९. ३० ते १०.३० या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता जुहूच्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पवई येथील ऑल्म्पिया येथे तर संध्याकाळी ४ वाजता जयहिंद महाविद्यालाच्या सभागृहात प्रार्थनासभेचा कार्यक्रम होणार असल्याचे हिरानंदानी रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.