पाकिस्तान आणि श्रीलंकादरम्यान झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा मारून पाच सट्टेबाजांना अटक केली. त्यामध्ये कुख्यात सट्टेबाज राजेश कौल उर्फ जोजो याचाही समावेश आहे.
वर्सोवाच्या यारी रोड येथील शीव शक्ती सोसायटीत हा छापा टाकण्यात आला.त्यावेळी पाच सट्टेबाज सट्टा लावताना आढळले. त्यांच्याकडून ५ लॅपटॉप आणि २६ मोबाईल तसेच एक लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. यावेळी अटक करण्यात आलेल्या कुख्यात सट्टेबाज याला २००७ मध्येही गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली होती.