पंढरपुरात १५० च्या आसपास डॉक्टर असून यात्रेदरम्यानच्या काळात हे सर्व डॉक्टर दवाखाने बंद करून पंढरपूरातून निघून जातात. गर्दीमुळे दवाखान्यात पोहोचता येत नाही आणि यात्रेदरम्यान पंढरपुरात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असते. याच कारणास्तव ते तेथून निघून जातात. परिणामी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पंढरपुरात भाविक दाखल होत असताना वैद्यकीय सुविधांची मात्र तेथे बोंब असल्याची बाब पुढे निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. तसेच सरकारच्या असंवेदशनील कृतीवर ताशेरे ओढत यात्रेदरम्यान वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होऊ शकेल यासाठी शहराबाहेर ‘नो मॅन्स लॅण्ड’चा पर्याय शोधण्याचे आदेश न्यायालयाने पंढरपूर नगरपरिषदेला दिले आहेत.