अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीबाबत जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ‘अयोध्या ८४ कोस परिक्रमे’चे आयोजन करण्यात आले आह़े  या परिक्रमेवर उत्तर प्रदेश शासनाने बंदी घातली आह़े  परंतु ही बंदी जुगारून २५ ऑगस्टपासून होणारी ही परिक्रमा यशस्वी करूनच दाखवू, असा निर्धार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रा़  व्यंकटेश आबदेव यांनी येथे व्यक्त केला़  
२५ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा होणार असून त्यात महाराष्ट्रातून सुमारे ४०० संत सहभागी होणार आहेत़  अयोध्येतूनच या यात्रेचा प्रारंभ होणार असून समारोपही अयोध्येतच होणार आह़े  यात्रेमागे कोणताही राजकीय हेतु नाही़  तसेच ती अतिशय शांततापूर्ण असेल़  त्यामुळे उत्तर प्रदेश शासनाने लादलेली बंदी मागे घ्यावी आणि आमच्या मार्गात अडथळा आणू नय़े  अन्यथा यात्रेत बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे वाईट परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला़
सरकारचा वटहुकूम अपयश लपविण्यासाठीच
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दिवसाढवळ्या हत्या होण्यापासून सरकार रोखू शकले नाही़  हे सरकारचे अपयश आह़े  हे अपयश लपविण्यासाठीच सरकार घाईघाईने जादूटोणाविरोधी कायदा अध्यादेशाच्या माध्यमातून आणू पाहत आह़े  सर्वाशी चर्चा केल्याविना घाईघाईने आणण्यात येणाऱ्या या अध्यादेशाला आमचा विरोध आह़े  अध्यादेश न काढण्याबाबत आम्ही शासनाला आणि राज्यपालांना निवेदन देऊ़  तरीही शासनाने ते रेटण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरुद्ध विहिंप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही आबदेव यांनी या वेळी दिला़  आमचा जादूटोणा, बळी देणे यांसारख्या गोष्टींना कायमच विरोध आह़े  मात्र या विधेयकात अनुष्ठान, यज्ञ आदी गोष्टींनाही विरोध आह़े  त्यामुळे या गोष्टी वगळून आणि इतरही सर्वाचे चर्चेतून समाधान करून मगचे हे विधेयक आणावे, असेही आबदेव म्हणाल़े