पोलीस अधिकाऱ्यांना १६ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Jail
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने(सीआयडी) अटक केलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना मंगळवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १६  नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल २० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी सीआयडीने त्यांना अटक केली होती.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी परमबीर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप आहे.  कुख्यात गुंड छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी सिंह यांनी दिली. तसेच पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज तयार करून अग्रवाल यांची कोटय़ावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. याच प्रकरणात गोपाळे आणि कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितली व अग्रवाल यांनी ती दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम एका व्यक्तीमार्फत घेण्यात आली होती. ती व्यक्ती हवाला ऑपरेटर असून न्यायवैद्यक पुराव्यांच्या माध्यमातून कोरके व गोपाळे यांचा या प्रकरणातील सहभाग सीआयडीच्या तपासात निष्पन्न झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Param bir singh extortion case 2 cops remanded in cid custody for 7 days zws

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या