स्वयंसेवी संस्था आणि यंत्रणांची संयुक्त कामगिरी

मुंबई : करोनाबाधिताचे घर ताब्यात घेऊन घरातील सर्व व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर घरात एकटय़ाच अडकलेल्या पोपटाची स्वयंसेवी संस्था, वनविभाग, मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सुटका केली.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

भांडुप येथील एका घरात करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर महापालिकेतर्फे १ एप्रिलपासून ताब्यात घेण्यात आला होता. या घरातील करोनाबाधिताचा मृत्यू झाला असून संबंधित घरातील सर्व व्यक्तींना अलगीकरण कक्षात नेण्यात आले, पण त्या घरात एक पाळलेला पोपट १ एप्रिलपासून पिंजऱ्यातच अन्नपाण्याविना होता.

पोपट तीन दिवसांपासूनच घरात असल्याची माहिती प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीला शनिवारी मिळाल्याचे संस्थेचे सदस्य आणि जिल्हा मानद पशुकल्याण अधिकारी सुशील कुंजू यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या वतीने मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, वनविभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या पोपटाची तातडीने सुटका करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार शनिवारी दुपारी महापालिका, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी भांडुप येथील या वस्तीत आले. सर्वप्रथम घराचा परिसर र्निजतुक करून, आरोग्यविषयक सर्व सुरक्षा साहित्याचा वापर करत मग संबंधित घराचे कुलुप तोडण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोपटाचा पिंजरादेखील र्निजतुक करून पोपटाची त्या घरातून सुटका करण्यात आली. त्यानंतर या पोपटाची रवानगी परळ येथील पशुरुग्णालयात करण्यात आली असून, पोपटाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती कुंजू यांनी दिली.

संघटनेची हेल्पलाइन

करोनाचा संसर्ग टाळण्याच्या पार्श्वभूमीवर एखादी इमारत, परिसर ताब्यात घेण्यात आल्यावर त्या घरातील पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर) एकटे पडू शकतात. अशा वेळी त्यांच्या अन्नपाण्याबाबत अडचणीची परिस्थिती होऊ शकते. मुंबईत अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र असा प्रसंग उद्भवलाच तर ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर’ संघटनेच्या ९८३३४ ८०३८८ या मदत क्रमांकावर संपर्क साधू शकता.