scorecardresearch

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी द्या; वरवरा राव यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबईत शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचार घेणे परवडणारे नाही. शिवाय मुंबईतील सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून हीच बाब आपल्याला तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करताना विचारात घेण्यात आली होती, असेही राव यांनी म्हटले आहे.

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी द्या; वरवरा राव यांची उच्च न्यायालयात याचिका
वरवरा राव (छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले तेलुगु कवी वरवरा राव (८२) यांनी मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे जाण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) नोटीस बजावली. तसेच राव यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा- Deven Bharti : “मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही.. आम्ही सगळे..”

मुंबईत शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचार घेणे परवडणारे नाही. शिवाय मुंबईतील सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून हीच बाब आपल्याला तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करताना विचारात घेण्यात आली होती, असेही राव यांनी म्हटले आहे. याउलट तेलंगणा येथून आपण निवृत्त झालो आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारक म्हणून तेथील वैद्यकीय सेवा घेण्यास पात्र आहोत, असा दावा राव यांनी हैदराबाद येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मागताना केला.

हेही वाचा- वडाळ्यात शिक्षिकेची अल्पवयीन मुलास बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडियो व्हायरल

परवानगी नाकारण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला राव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राव यांना सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये आरोग्याच्या कारणास्तव कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. आदेशातील अटीनुसार, राव यांना मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाचे कार्यक्षेत्र सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी तीन महिने हैदराबादमध्ये जाण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी राव यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये विशेष न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 21:59 IST

संबंधित बातम्या