नवी दिल्ली : इंधन दरात सलग चौथ्या दिवशी रविवारी ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबईत पेट्रोल दराने ११५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत पेट्रोल दर ११५.१५ रुपये असून, डिझेलदर १०६.२३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी १०९.३४ रुपये, तर डिझेलसाठी ९८.०७ रुपये मोजावे लागत आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठय़ा शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडासह अनेक भागांत पेट्रोलने सर्वाधिक म्हणजे १२० रुपयांचा टप्पा ओलांडला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2021 रोजी प्रकाशित
मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर
मध्य प्रदेशातील छिंदवाडासह अनेक भागांत पेट्रोलने सर्वाधिक म्हणजे १२० रुपयांचा टप्पा ओलांडला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-11-2021 at 04:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol in mumbai at rs 115 per ltr zws