कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेसंबंधी रिझर्व्ह बँक (आरबीआय) ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर कऱणार आहे. आरबीआयने आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्पन्न झाली. यावेळी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणं शक्य नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती एका खातेधारकाने दिली आहे. तसंच आरबीआयने २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं सांगितलं आहे. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असंही आश्वासन दिलं.

आणखी वाचा- “मोदीजी नक्की कोणते दिवस आणलेत ?”, पीएमसी खातेधारकांचा संतप्त प्रश्न

दरम्यान पीएमसी बँक घोटाळाप्रकणी अटकेत असणाऱ्या आरोपी राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध आणण्यात आले असून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे अनेक खातेधारक चिंताग्रस्त असून धक्क्याने दोन खातेदारांचा मृत्यूदेखील झाला आहे. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने आधीच चिंताग्रस्त असणाऱ्या खातेदारांच्या चिंतेत भर टाकली असून दिलासा देण्यास नकार दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc bank rbi narendra modi azad maidan sgy 87
First published on: 22-10-2019 at 16:35 IST