गेल्या दोन आठवडय़ांपासून दिल्लीतल्या ‘त्या’ तरुणीविषयी सोशल नेटवर्किंग साइट्सवर हळहळ व्यक्त होत होती. तिच्या प्रकृतीला आराम पडावा, तिला पुन्हा सामान्य आयुष्य जगता यावे यासाठी प्रार्थना व्यक्त होत होत्या. त्याचबरोबर ‘त्या’ नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही जोर धरत होती. शनिवारी मात्र तरुणीच्या मृत्यूमुळे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शोककळा पसरली होती.
तरुणीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच तिला तातडीने न्याय मिळायलाच हवा अशी आग्रही मागणी करणाऱ्या प्रतिक्रियाही उमटत होत्या. अभिनेता सलमान खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त न्यायालयात गरहजर राहण्याची परवानगी मिळते मग या तरुणीला लवकरात लवकर का न्याय मिळू शकत नाही, असा सवालही फेसबुकवर उपस्थित झालेला पहावयास मिळाला.          
फेसबुकवरील काही निवडक प्रतिक्रिया
* माणुसकीचा शेवट म्हणजे जगाचा शेवट – मधुरा भास्कर
* आम्हाला फक्त आश्वासने नकोत, तर सरकार आणि पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. चित्रपट आणि जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणाऱ्या स्त्रीच्या प्रतिमेबाबतही पुनर्विचार करावयास हवा. – शैलेश मिश्रा   
* देशात ‘ती’ एक पडद्यामागची लढाऊ सनिक ठरली आहे. तिची आहुती समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल घडवण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल. – जॉन दयाल
* आपण आपल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता रुजविण्यात असफल ठरलो आहोत. तसेच कमकुवत न्यायव्यवस्थेमुळे कायद्यातील पळवाटाही आरोपींनी दोषमुक्त करण्यास पुरेशा आहेत.- जॉन डिसूझा
* सामूहिक बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा हीच तरुणीला खरी श्रद्धांजली ठरेल. – धोंडाप्पा नंदे वागदरी
* पीडित तरुणीने ज्या परिस्थितीत मृत्यूशी झुंज देत दोन आठवडे काढले, त्यासाठी तिच्या अपराध्यांना फाशीपेक्षाही कठोर दंड व्हायला हवा. बलात्काराचे वाढते प्रमाण पाहाता गुन्हेगारांना होणाऱ्या कडक शिक्षेमुळे संभाव्य गुन्हेगारांना देखील जरब बसेल. – कांचन फिरदोस कराई
* दिल्लीतल्या घटनेने समाजमान हेलावले आहे. अपराध्यांना देहदंडापेक्षा मोठी शिक्षा असूच शकत नाही. पण त्यामुळे स्त्री सुरक्षित होईल? हा प्रश्न तसाच राहील. आपण नेहमी पोलिसांना, सरकारला जो तो दोष देताना दिसतो. मात्र, पालकच आपल्या पाल्यावर संस्कार करायला कुठेतरी कमी पडत आहेत हे आपण विसरतोय. – भाग्यवंत लोणारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवरील प्रतिक्रिया
* मं भी निर्भया.. तू भी निर्भया.. अब सारा देशही निर्भया, आम्हाला तुझा अभिमान आहे, तुझे बलिदान आम्ही वाया नाही जाऊ देणार.. पंतप्रधानांना तीन मुली आहेत पण आमच्या आया-बहिणींना त्याचा काय उपयोग? त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poeple want justice
First published on: 30-12-2012 at 03:27 IST