scorecardresearch

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपी अटकेत

घराबाहेर खेळणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीला शेजारच्या व्यक्तीने स्वत:च्या घरी नेऊन बलात्कार केल्याची घटना रविवारी मानखुर्द परिसरात घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. हेही वाचा >>> धक्कादायक! ऑटोरिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने दोन मजुरांचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कारआणखी वाचाशिवसेना सोडण्याआधी राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? मी साक्षीदार आहे म्हणत एकनाथ शिंदेंचं विधान!Eknath Shinde […]

neighbour arrested for raping 6 year old girl
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

घराबाहेर खेळणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीला शेजारच्या व्यक्तीने स्वत:च्या घरी नेऊन बलात्कार केल्याची घटना रविवारी मानखुर्द परिसरात घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हेही वाचा >>> धक्कादायक! ऑटोरिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने दोन मजुरांचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार

मानखुर्दमधील लल्लूभाई कंपाउंड परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याच वेळी शेजारीच राहणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीने तिला त्याच्या घरी नेले. तेथे आरोपीने मुलीवर बलात्कार केला. मुलगी रडू लागल्याने त्याने तिला घरी सोडले. यावेळी मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरमी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:50 IST
ताज्या बातम्या